• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

नगरसेविका वनिता काळे यांच्या वतीने मोफत औषधे वाटप


खोपोली : प्रसाद अटक

कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक जन काळजी घेताना दिसून येत आहेत. तसेच राज्य सरकार व प्रशासन देखील सज्ज झाले आहे खोपोली नगरपालिका शीळ फाटा प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेविका वनिता काळे यांनी माझा प्रभाग माझी जवाबदारी अंतर्गत प्रभागातील नागरिकांना कोरोना विषाणूंची लागण होऊ नये तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवली जावी या करीता मोफत औषधांचे वाटप केले.

या प्रसंगी नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक सुनील पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते हरेश काळे उपस्थित होते.