• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

नगरसेवक संकेत भासे यांच्या प्रयत्नाने दिव्यांग बांधवांना संजीवनी, पालिकेकडून एक हजाराची मदत!


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळात दिव्यांग बांधवाना शासनाकडून अन्न - धान्य , औषध व इतर गरजा भागविण्यासाठी मदत देण्याची मागणी नगरसेवक संकेत भासे यांनी कर्जत नगर परिषदेस केली होती . त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पालिकेने त्यांची मागणी मान्य केली असून दिव्यांग बांधवांना एक हजाराचा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या धर्तीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत .

कर्जत नगर परिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांना कोरोना महामारीच्या काळात शासनाकडून अन्न - धान्य याचे वाटप करण्यात आले आहेच मात्र त्यांना आर्थिक बळ येण्यासाठी शासनाच्या अपंग कल्याण योजनेच्या माध्यमातून निधीची तरतूद असते . पालिकेचे नगरसेवक संकेत भासे यांनी याबाबतीत दिव्यांग बांधवांना मदत व्हावी म्हणून मुख्याधिकारी डॉ . पंकज पाटील यांना पत्र व्यवहार केला होता त्याप्रमाणे मा . जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अपंग कल्याण निधी योजनेतून दिव्यांग बांधवांना कोरोना महामारीच्या लॉकडाऊनच्या काळात औषधोपचार व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी एक हजाराचा निधी मंजूर केला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या धर्तीवर दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असून मिळालेला निधी हा कोरोना महामारीच्या काळात दिव्यांग बांधवांना गरजेचा ठरणार आहे , त्यामुळे नगरसेवक संकेत भासे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन दिव्यांग बांधवांना संजीवनी देऊन गेले असल्याने दिव्यांग बांधवांनी नगरसेवक संकेत भासे यांचे तसेच मुख्याधिकारी डॉ . पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी यांचे आभार मानले आहेत .

26 views0 comments