• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत नविन नोंद


आंदोलन : प्रतिनिधी

भारतात सध्या एक लाख एक्कावन्न हजारहून अधिक रुग्ण असून मागील चोवीस तासांत सहा हजार तीनशेपेक्षा अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भारतातील रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. तर मागील चोवीस तासांत 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असून चोवीस तासांत दोन हजारांपेक्षा अधिक नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यात 97 लोकांचा मृत्यू झाला असून ही संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासांत एक हजार दोन रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, मुंबईत आता एकूण कोरोबाधितांची संख्या बत्तीस हजार नऊशेपेक्षा अधिक झाली आहे. तर, एक हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.