• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

देविच्यापाड्यात लाॅक डाऊन कि ऐसी कि तैसी

देविच्यापाड्यात लाॅक डाऊन कि ऐसी कि तैसी.

सामाजिक अंतर उपाययोजनेची पायमल्ली

प्रशासनाच दूल॔क्ष, तळोजा पोलिस हतबलतळोजा : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 2मधील देविचापाडा या गावात व रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी लोकांकडून पहायला मिळते. जिवनावश्यक वस्तू च्या नावाखाली सकाळीसहा वाजल्यापासून आजूबाजूच्या गावातील लोकांकडून देविच्यापाड्यातील रस्त्यावरच भाजीपाला व इतर दुकने थाटलेली असतात. दिवसाला शंभर व दोनशे रूपये या दुकानवाल्यांकडून घेवून काही समाजकंटक हि दूकाने बसवात आहेत असे स्वता ते दुकानवाल्यांनीच म्हटले आहे. चक्क तळोजा पोलिसाच्या समोर पञकाराला तुम्हाला हि शंभर रूपये देतो आम्हाला रस्त्या वर बसू द्या असे दुकानवाले म्हणत होते. जिवनावश्यक वस्तू घेण्यासाठी एक व्यक्तीच्या सोबत चार पाच व्यक्ती. सकाळी या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळते. या गावात बाहेरील व्यक्तीचा मोठा सहवास आहे. परप्रांतीय, बंजारा समाज, आसामी समाज, या समाजातील लोकांना लाॅकडाऊन म्हणजे काय हेच माहिती नाही. कोरोना या रोगाच महत्वच त्यांना कळत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून मोठया प्रमाणावर सामाजिक अंतर उपाययोजनाची पायमल्ली होताना दिसुन येते . तसेच परप्रांतीयाकडून देविच्यापाड्यात लाॅक डाऊन कि ऐसी कि तैसी पहायला मिळत आहे. याकडे पनवेल महानगरपालिकेचे दूल॔क्ष असून तळोजा पोलिस स्टेशनचे कम॔चारी या परप्रांतीयाच्या व आजूबाजू गावच्या स्थानिक नागरिकांच्या पुढे हतबल झाल्याचे दिसून येते. यामुळे हि परिस्थिती अशीच राहिली तर कोरोना पसरण्याची शक्यता नाकारत येत नाही.सुदैवाने देविचापाडा परिसरात व आजूबाजूच्या गावात सध्यातरी कोरोनाचा शिरकाव नाही.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊनची परिस्थिती आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लाॅकडाऊन केले आहे. परंतू देविचापाड्यात माञ सव॔ नियम व कायद्याची पायमल्ली होताना दिसत आहेत. पोलीस प्रशासन सुद्धा मोटर वाहनांनावरच्या कारवाई शिवाय दूसर काहिच करताना दिसत नाही अशी ओरड नागरिक करत आहेत. सदर देविचापाडामध्ये बाहेरील लोकांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडून गावांतील काही समाजकंटक दिवसा शंभर दोनशे रूपये घेवून दुकाने रस्त्यावर थाटत आहेत. पनवेल महानगरपालिकेला कळवून सुद्धा ते कारवाई करत नाहीत. याचा अथ॔ काय होतो, जर अशीच परिस्थिती राहिली तर देविचापाडा या गावात शेजारीची 10ते 15 गावची लोक दररोज येत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. सकाळी अनेक परप्रांतीय नागरीक तोंडाला मास्क न लावताच बाजारात फिरायला येत असतात. तसेच राञीचा फायदा घेत परप्रांतीय व स्थानिक महिला व लहान मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसून येतात. जर हे थांबवल नाहि तर जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली संपूण॔ परिसर कोराना ग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लवकरात लवकर प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करून तसेच तळोजा पोलिसांनी सुद्धा कठोर होऊन कठोर कारवाई करणे आवश्यक आहे अशी मागणी देविच्यापाड्यातील नागरिकांनी केली आहे.