• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

देवा ग्रुप फाउंडेशन च्या रायगड जिल्हा सचिवपदी कल्पेश चितळे यांची निवड

Updated: Jul 31, 2020

देवा ग्रुप फाउंडेशन च्या रायगड जिल्हा सचिवपदी कल्पेश चितळे यांची निवड
मोहोपाडा : गौतम सोनावणे

महाराष्ट्रभर सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेल्या देवा ग्रुप फाउंडेशनच्या सचिव पदी नुकतीच चावंडोली येथील सामाजिक कार्यकर्ते कल्पेश चितळे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले व महाराष्ट्र राज्य सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश चितळे यांची निवड करण्यात आली. रसायनी पाताळगंगा परिसरातील चावंडोली येथील कल्पेश चितळे यांनी कमी वयातच सामाजिक कार्याचा वसा घेतला असून परिसरातील सामाजिक कामात त्यांनी कोरोना महामारी काळात तळा - गाळातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे.

देवा ग्रुप फाउंडेशनचे काम करत असताना त्यांनी भीमशक्ती माथाडी जनरल युनियनच्या माध्यमातून आदिवासी कष्टकरी कामगारांना रोजगार देऊन मदत केली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची देवा ग्रुप फाउंडेशनच्या रायगड जिल्हा सचीव पदी निवड करण्यात आली असून परिसरातून त्यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

164 views0 comments