• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

देवदूतांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी किटचे हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या हस्ते वाटप!


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चारफाटा येथे कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळात शासनाचे आदेश , नियम , पाळत आपले कर्तव्य चोख बजावत नागरिकांची सुरक्षितता राखण्याचे काम पोलीस यंत्रणा करत आहेत , या देवदूतांच्या आरोग्याची काळजी काही सामाजिक कार्यकर्ते , राजकीय मंडळी , तर शासकीय अधिकारी - कर्मचारी वर्ग घेताना दिसत आहेत . हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते या देवदूतांना सेफ्टी किटचे वाटप कर्जत चाराफाटा येथे करण्यात आले .

कोरोना विषाणू संसर्ग काळ २० मार्च ते आजपर्यंत असताना संचारबंदी, लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिन्ग, आदी नियमावलीत पोलीस यंत्रनेने महत्वाची भूमिका बजावली. घरात रहा, सुरक्षित रहा, या शासनाच्या आदेशाची अमलबजावणी करताना आपले कर्तव्य चोख बजावत होते, तर बाहेरच्या गाडया आपल्या शहरात येतात त्यांना अटकाव करत कर्जतकर तसेच तालुक्यातील नागरिकांची सुरक्षा प्रवेशद्वारापासूनच रात्रंदिवस चोख करत होते . अशा देवदूतांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जात आहे. आज कर्जत चाराफाटा येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.अहिरे सर, श्री.रजपुत सर यांच्या कडून कर्तव्यावर असलेले देवदूत पोलिस, शिक्षक व आरोग्य अधिकारी यांना मास्क, सँनिटायझर, सेफ्टी कीटचे वाटप हालिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत उपसरपंच तसेच विभाग प्रमुख सुरेश बोराडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

19 views0 comments