• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

दारू खरेदीसाठी कर्जतमध्ये मद्यप्रेमींची झुंबड, दुकानांसमोर रांगाच रांगा !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

मनुष्यप्राणी हा सवयीचा गुलाम आहे . वर्षेनुवर्ष त्याला एखाद्या व्यसनाची सवय लागली असेल तर तो त्या व्यसनाचा अधीन होतो. म्हणूनच दारू पिणारे तळीराम शासनाच्या " ड्राय डे " ला देखील वेडीपीशी होतात. मात्र कोरोना विषाणूमुळे देशासहीत कर्जतमध्येही संचारबंदी व लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंखेरीज दारू कुठेच मिळेनाशी झाली होती, त्यामुळे सर्वच तळीरामांचा घसा जवळजवळ ५० दिवस कोरडाच राहिला असल्याने तळीरामांची स्थिती कधी एकदा लॉकडाऊन संपतोय अशी झाली होती. त्यातच दारू म्हणजे तळीरामांची जीव कि प्राण ! माणूस सुखात याचा आस्वाद घेतो तसा दुःखात हि दारूशी जवळीक साधतो. यांत तळीराम दारूशिवाय राहू शकत नसल्याने व त्याच्यामुळे शासनाला करोडो रुपये कर स्वरूपात मिळत असल्याने शासनाच्या आदेशाने मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी २० मार्च २०२० पासून वाईन्स शॉप , बिअर शॉपी , बंद करण्याचे आदेश दिले होते. तळीरामांची दारू अभावी झालेल्या गोचीमुळे संचारबंदीेत " कुठे कुठे शोधू मी तुला " अशी अवस्था झाल्याचे चित्र येथे दिसत होते. त्यामुळे प्रसंगी मोहाची, गावठी, तर कधी चढ्या भावात मिळालेली दारू ढोसून घसा ओला करण्याचे काम काही दिवस तळीराम कर्जतमध्ये करत होते.

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्जत मध्ये आज दि. ४ मे पासून सकाळी नऊ वाजल्यापासून दारूची दुकाने सुरू झाली, कर्जत रेल्वे स्टेशन बाहेरच असणाऱ्या संतोष वाईन्स या दारूच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. त्यामुळे ५० दिवसाच्या विश्रांतीनंतर तळीराम मनसोक्त दारू ढोसणार , हे तितकेच सत्य आहे, मात्र त्यांच्या दारू पिण्याने राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. शासनाच्या आदेशाने पुन्हा दारूची दुकाने बंद होऊ शकतात हि भीती देखील तळीरामांच्या मनात असल्याचे दिसत आहे .