• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

दांडफाटा जवळील माळरानावर काँग्रेस पक्षातर्फे वृक्षारोपण


रसायनी : गौतम सोनावणे

"झाडे लावा, झाडे जगवा" या उद्देशाने दिनांक ५ जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र युवक काँग्रेस व रसायनी युवक काँग्रेसच्या वतीने दांड फाटा जवळील माळरानावर वृक्षारोपण करण्यात आले. या माळरानावर कडुलिंब, बदाम, आंबा व इतर औषधी वनस्पतीच्या ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सागर सुखदरे, रायगड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष दिपाली म्हात्रे, मोहोपाडा ग्रामपंचायतीचे मा. सरपंच तथा खालापूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष कृष्णा पारंगे, एम.एस यु.आय. चे अध्यक्ष कुणाल जाधव, शयान उस्माने, संदेश ढवळे, सचिन कुरंगळे, दिनेश पाटील, दिवेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

"यावेळी झाडे लावा झाडे जगवा" या उद्देशाने दांडफाटा माळरान परिसरात लावलेल्या रोपांची निगा व जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.