• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

'ते' 4 जवान कोरोनाग्रस्त!


ब्युरो रिपोर्ट :

मालेगाव येथून बंदोबस्तावरून परत आलेल्या हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या विलागीकरण कक्षात ठेवलेल्या आणखी 4 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 11 झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह जवानांची संख्या एकूण 10 झाली आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील अधिकारी व जवान मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये परतले होते. या 194 अधिकारी व जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले होते.

त्यापैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल 21 एप्रिलला मिळाला होता. दरम्यान, एसआरपीच्या विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 4 जवानांचा पहिला थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला होता.

दरम्यान 4 जवानांना जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करून त्यांचे दुसऱ्यांदा थ्रोट स्वॅब घेतले. आज 27 एप्रिलला या 4 जवानांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.