• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

तुराडे हद्दीतील गोरगरिबांना किराणा वस्तूंचे वाटप

श्री. गणेश वर्तक, श्री. सुरेश ठाकूर व श्री. अविनाश वाघमारे, यांच्यातर्फे तुराडे हद्दीतील गोरगरिबांना किराणा वस्तूंचे वाटपगुळसुंदे : विश्वनाथ गायकवाड

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभर संचारबंदि असल्यामुळे प्रत्येकजण घरामध्ये अडकले आहेत. हाताला काम नसल्यामुळे बाहेरून पैसे येणाचे मार्ग बंद झाले आहेत. डोंगराळ भागात वास्तव्य करणारे अदिवासी व रोज कष्ट करणारा गोरगरीब समाज हा रोजच्या मिळालेल्या पैश्यातून आपले घर खर्च चालवित असतो. मात्र महिनाभर घरामध्ये राहत असल्यामुळे अनेकांकडून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.

त्यांच्यासाठी काहीजण जिवनावश्यक वस्तू तर काही दानशूर व्यक्तींनी भाजी पाला देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

तुराडे परिसरात असलेली तुराडे ठाकूरवाडी कष्टकरीनगर ठाकूरवाडी वाडी येथे जावून त्यांची समस्या विचारात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत श्री. गणेश वर्तक, श्री. सुरेश ठाकूर व श्री. अविनाश वाघमारे यांनी स्वखर्चाने जिवनाश्यक वस्तू

दान स्वरूपात वाटप करण्यात आले.


प्रत्येकाला पोटभर अन्न मिळावे कोणीही उपाशी राहू नये, यासाठी गेले महिनाभर विविध संघटना तसेच दानशूर व्यक्ती आपल्याला शक्य होईल त्या विचारांतून मदत करीत आहेत.

गेले महिनाभर घरामध्ये असल्यामुळे काही व्यक्तींच्या घरामध्ये धान्यांचा एकही दाना नसतांना एक पाऊल पुढे टाकत मदत करण्यासाठी प्रत्येकांचे हात पुढे सरसावत आहे. कारण माणूस जगला पाहिजे हे धोरण मनाशी बाळगून प्रत्येकजण आपल्या परीने मदत करीत आहेत. यावेळी या वाड्यामध्ये जावून त्यांस जिवनाश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य फुलतांना पहावयास मिळाले.

यावेळी या वाड्यामध्ये जिवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले. शिवाय संचार बंदीचे उल्लंघन न करता सोशल डिस्टंस चे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळेस 450 गोरगरीब आदिवासी, कष्टकरी यांना किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी तुराडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच मनोहर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, भाऊ ठाकूर, दता कोडकर, नाना माळी, अशोक सोनावणे, यावेळी उपस्थित होते.

57 views0 comments