• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

तुराडे ग्रामपंचायत ,लोना इंडस्ट्रीज आणि ठक्कर कंपनी यांच्या वतीने धान्य व किराणा वस्तूंचे वाटपगुळसुंदे : व्ही. व्ही. जी

जगात कोरोना विषाणूने भयंकर थैमान घातले असताना या विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशात २४ मार्च पासून लॉक डाउन ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बऱ्याच कंपन्या व उद्योग धंदे बंद आहेत. परिणामी गावातील लोकांचा रोजगार बुडाला असल्याने आहे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या अनुषंगाने सरपंच चंद्रकांत भोईर, मा. उपसरपंच मनोहर चव्हाण, उपसरपंच हरेश पठारे यांनी लोना इंडस्ट्रीज, ठक्कर या कंपन्या ना भेट देऊन काही मदत मिळवून व काही ग्रामपंचाय यांच्या वतीने तुराडे गावातील आणि कष्टकरीनगर मधील गरीब गरजू लोकांना अन्न धान्य व किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

यावेळी सरपंच चंद्रकांत भोईर यांनी लोना इंडस्ट्रीज व ठक्कर कंपनीचे आभार व्यक्त केले.

यावेळी सरपंच चंद्रकांत भोईर,मा.उप सरपंच मनोहर चव्हाण, उपसरपंच हरेश पठारे, विश्वनाथ गायकवाड, भाऊ ठाकूर, प्रतिभा कोनकर, शीतल माळी, दादा साहेब आत्पडकर, सुनील राठोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.