• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

तुपगाव ग्रामपंचायतीतील महिला कर्मचारी तपासणी अहवाल निगेटिव्ह

Updated: May 24, 2020


  


चौक : रोहिदास ठोंबरे


देशभरासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने गुरुवारी दि.२१ मे रोजी चौक परिसरातील सर्वांनाच धक्का दिला.काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत तुपगाव येथे कार्यरत असलेल्या महिला लेखणीक यांचे पती पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामपंचायत तुपगाव,चौक,आसरे, लोधिवली या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व त्या अनुषंगाने चौक बाजारपेठ देखील बंद करण्यात आली होती. असे असले तरी आज चौककरांना दिलासा देणारी बातमी आहे. तुपगाव ग्रामपंचायतील महिला कर्मचारी यांची कोरोना (कोव्हीड - 19) तपासणी निगेटिव्ह आली आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे तुपगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक सचिन कुराडे व सरपंच महेश परीट यांनी सांगितले आहे.

सविस्तर वृत्त असे की,

तुपगाव ग्राम पंचायत मध्ये कार्यरीत असलेल्या व्यक्तीच्या पतीला कोरोनाची लागण झालेलं स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती आष्टे गावची रहिवाशी आहे. तरी व्यक्तीच्या पंचायत मधले सर्व कर्मचारी संपर्कात आले होते.सदर पंचायत मधील कार्यरीत असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट काय येत आहे,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

ऐतिहासिक चौक गावातील बाजारपेठ ही चाळीस गावांची मोठी बाजारपेठ म्हणून मुख्य मानली जाते.इथे रोजच गर्दीचा माहोल असतो.मात्र थायरो केअर लॅब तुर्भे नवी मुंबई इथे या महिलेचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.