- हक्कासाठी आंदोलन
तिखट मसाला करण्यासाठी गर्दी

(भर दुपारी कडक उन्हात मिर्ची दळणासाठी रांगा)
चौक : अर्जुन कदम
पावसाळ्याची तयारी म्हणून तिखट मसाला व त्याची इतर सामूग्री दळनासाठी चौक च्या मसाला गिरणीत पहाटे पासूनच रांग लागत आहे.
ग्रामीण भागातील सुगरणी अजूनही पावसाच्या दिवसासाठी मसाला करून ठेवतात.कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे बाजार बंद आहे,आता त्यात शिथिलता आल्याने हळूहळू बाजारात गर्दी होत आहे,ग्रामीण भागातील सुगरणी पावसाच्या दिवसासाठी तिखट मसाला,हळद,गरम मसाला,पापड,कुरड्या,ओली मिरची मसाला भरून सुकवणे,वाला ला माती लावून सुकवणे अशी पावसापूर्वी पूर्व तयारी करून ठेवतात,बाजारपेठ बंद असल्याने ही कामे उशिरा सुरू झाली आहेत,सुमारे दीड महिन्यानी बाजार हळूहळू सुरू झाल्याने प्रथम मिर्ची खरेदीसाठी गर्दी झाली,मिर्ची साफ व सुकऊन ती दळण्यासाठी चौक मध्ये एकमेव चक्की वर आणली जात आहे,पहाटे पासूनच ग्रामीण भागातील लोक मिर्ची घेऊन रांगेत उभे असून भर दुपारी ही रांग वाढत जात असल्याचे चित्र आहे,चौक ही सुमारे चाळीस गावची बाजारपेठ आहे,प्रत्येक गावात पिठाची चक्की आहे,मात्र मसाला चक्की एकच असल्याने भर उन्हात गर्दी दिसत आहे.या रांगेत सुगरणी,वयस्कर गृहिणी व वयस्कर पुरुष उभे दिसत असून तरुण मद्यप्रेमी दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे दिसत आहेत.