• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

डोलवली आश्रमशाळेच्या वतीने गरजूंना धान्य वाटप


खालापूर : प्रसाद अटक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली तसेच काम उद्योग व्यवसाय व मोलमजुरी ची कामे बंद आहेत मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येकजण सहकार्य करीत आहे.

सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत माणकीवली हद्दीतील डोलवली शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने माणकीवली कातकरवाडी, डोलवली कातकरवाडी ,अंजरून कातकरवाडी, येथील कुटूंबाना तांदुळ, तेल, मीठ, गहू डाळी, मसाले यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.पाटील, अधीक्षक आर. एस. डावरे, यांच्यासह माणकीवली ग्रामपंचायत उपसरपंच अजय भारती, सदस्य विकास रसाळ , वामन देशमुख , सदस्या नीलम चोरगे, सारिका पवार उपस्थित होते.