• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

टायगर ग्रुपचे रायगड जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान


पनवेल : प्रतिनिधी

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. पै. तानाजी भाऊ जाधव व अनिकेत भाऊ घुले यांच्या नेतृत्वाखाली टायगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदुस्थान नगर व रियल होम आणि करूणेश्वर वृद्ध आश्रम येथे अन्नदान करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका चिटणीस तथा वाकडी ग्रामपंचायत मा, सरपंच नामदेव जमदाडे , प्रकाश जाधव संपर्क प्रमुख रायगड जिल्हा, चिंद्रन विभाग चिटणीस भाई पद्माकर म्हसकर व युवा नेते मंगेश भाई पाटील ,नितेश थले, अजित कदम , विलास चव्हाण आदी उपस्थित होते.