• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

जेष्ठ मार्गदर्शक नारायण ठाकरे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन


चौक : अर्जुन कदम

चौक गावचे व वाणी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक, सल्लागार नारायण रामचंद्र ठाकरे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले.

कै.नारायण रामचंद्र ठाकरे हे वन खात्याच्या लाकडाचे ठेकेदार होते.रायगड व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात त्यांनी काम केले असून आदिवासी आश्रमात ते पुस्तके व अन्नधान्य पोहच करण्याचे काम करीत होते.त्यांना तीर्थाटन करण्याची आवड होती, चारधाम, हरिद्वार, सोरटी सोमनाथ, रामेश्वर, प्रयाग अशा अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी जाऊन आले,नन्तर त्यांनी अनेकांना या ठिकाणचे दर्शनासाठी घेऊन जात असत.हा छंद त्यांनी जोपासला.चौक च्या जेष्ठ नागरिकांचे ते सल्लागार होते,समाजाच्या जडणघडण मध्ये त्यांनी तनमनधना ने काम केले.त्यांच्या मागे दोन विवाहित मुलगे,एक मुलगी,नातवंडे असा परिवार असून नुकतेच भारतीय प्रशासन सेवेतुन निवृत्त झालेले यशवंत ठाकरे(भा.प्र.से.) हे त्यांचे चिरंजीव आहेत.