• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

जिल्ह्यातील महसूल विभाग सर्वच संकटावर मात करत आहे-जिल्हाधिकारी रायगडचौक : अर्जुन कदम

रायगड जिल्ह्यात आलेले निसर्गचक्री वादळ असो किंवा  आज पर्यंत कोरोना चा असलेला हाहाकार यावर जिल्ह्यातील महसूल खाते मात करीत असून महसूल विभागाच्या सर्वच कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे,असे गौरव उदगार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत.राज्य महसूल दिन खालापूर तहसील कार्यालयाच्या नेताजी पालकर सभागृहात सम्पन्न झाला.यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत यांच्या वतीने खालापूर येथील सरनौबत नेताजी पालकर सभागृहात महसूल दिन साजरा करण्यात आला.यावेळी महसूल दिनानिमित्त रोहा येथील नायब तहसीलदार कै.संजय नागावकर यांच्या स्मरणार्थ कोरोना संदर्भात प्रतिजन चाचणी,रक्त तपासणी व ब्लड बँक एमजीएम यांच्या सहकार्याने  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.याचे उद्घाटन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी व खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार उपस्थित होते. चक्रीवादळात व कोरोना मध्ये महसूल विभाग रात्रंदिवस काम करीत आहे,अनेकजण कोरोना वर मात करून पुन्हा रुजू झाले आहेत,हे करत असताना स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या,या मानसिक रोगात मनाची तयारी ठेवा असे आवाहन केले.नायब तहसीलदार सर्वश्री विजय पुजारी,कल्याणी कदम,जयश्री जोगी,मंडळ निरीक्षक नितीन परदेशी,पुरवठा अधिकारी महेश पाटील सर्व तलाठी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.