• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत चाळके यांच्याकडून पराडे आदिवासी वाड्यांत किराणा सामानाचे वाटप..

ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत चाळके यांच्याकडून पराडे आदिवासी वाड्यांत किराणा सामानाचे वाटप व मोहोपाडा येथे अन्नदान..

मोहोपाडा : गौतम सोनावणे

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉकडाऊन परिस्थिती असताना रसायनी विभागातही शासनाच्या या वाढिव लॉकडाऊन ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु हातावर पोट भरणारे काम धंदे बंद असल्यामुळे रोजंदारी व मासेमारी करणारा तसेच दुसऱ्याच्या शेतात काम करून गुजराण करणारा आदिवासी बांधवावर घरातच बसण्याची वेळ आली आहे.

घरात असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत आदिवासी बांधव आहे. त्यांच्या चिंतेमुळे रसायनी परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत चाळके यांनी पराडे येथील अदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. पराडे येथील 103 आदिवासी बांधवाच्या कुटूंबाला जीवनावश्यक किराणा वस्तू घरोघरी जाऊन वाटप केले.

पराडे येथील आदिवासी बांधवाने यावेळी हेमंत चाळके यांचे आभार मानले. त्यानंतर मोहोपाडा येथे गोरगरिबांना दुपारच्या जेवणाची स्वखर्चाने व्यवस्था ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत चाळके यांनी केली होती. यावेळी विभाग प्रमुख अजित सावंत, संतोष पांगत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

3 views0 comments