• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

जय शिर्क कामगारांना हिंद भारतीय जनरल कामगार सेनेला पसंती, कामगारांच्या हितासाठी लढाऊ नेतृत्व


रसायनी : राकेश खराडे

हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश (आप्पा) पराडकर यांच्या नेतृत्वाखाली जय प्रेसिशन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ,मोहोपाडा या कंपनीतील ८५० सदस्यांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले असल्याचे केवल माली यांनी सांगितले.

याप्रसंगी सदस्य नोंदणी शुल्क संघटनेच्या महाराष्ट्र चिटणीस अपूर्वा प्रभू आणि रायगड जिल्हा सरचिटणीस केवल माळी यांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने स्वीकारल्याची माहिती हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस घनःश्याम नाईक यांनी दिली आहे. शिवनगर -मोहोपाडा येथील जय शिर्क प्रोडक्ट लिमिटेड ही कंपनी छोट्या प्लास्टीक खेळण्यांचे उत्पादन करीत आहे. या कंपनी मुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला असून संसाराचा गाडा चालत आहे. सध्या वाढत्या महागाईत आपले वेतन वाढून विविध सुखसोयी मिळाव्यात या आशेने ८५० सदस्यांनी हिंद भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे. जय शिर्कमध्ये कामगारांनीच आपल्या हितासाठी युनियनचे नेतृत्व स्विकारल्याने या कामगारांवर कोणताच अन्याय होवू देणार नाही असे, जिल्हा सरचिटणीस केवल माळी यांनी बोलताना सांगितले.

लाॅकडाऊन काळात कंपनीकडून 20 टक्के पगार देण्यात आला परंतु संघटनेचे अध्यक्ष निलेश पराडकर यांच्या मध्यस्थीनंतर ३५ टक्के पगार देण्यात आला. युनियनतर्फे प्रशासनाकडे कामगारांच्या हितासाठी विविध मागण्या करण्यात आल्या त्या कंपनीने ही मान्य केल्याचे समजते. यात पगारवाढ, कामावर आठ तास, कॅन्टीन सुविधा, पंचिंग मशिन चालू करणे, मेडिक्लेम सुविधा, विनाकारण कामगारांना कामावरून कमी न करणे, काही अंतरावरुन येणा-यांसाठी बस सुविधा सुरू आदी मागण्या करण्यात आल्या असून कंपनीने या प्रश्नांना दुजोरा दिल्याचे जिल्हा सरचिटणीस केवल माळी यांनी सांगितले.