• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश (आप्पा) पराडकर यांची जय प्रेसिजन प्रोडक्टड इंडिया कंपनीला भेट

जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश (आप्पा) पराडकर यांची जय प्रेसिजन प्रोडक्टड इंडिया प्रा.लि कंपनीला भेट


रसायनी : गौतम सोनावणे

महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे तसेच हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सहसंपर्क प्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांनी रसायनी येथील जय प्रेसिजन प्रोडक्ट इंडिया प्रा.लि. कंपनीमधील कामगार आणि व्यवस्थापनाची भेट घेतली.

जय प्रेसिजन कंपनी मधील कामगारांनी निलेश पराडकर यांच्याकडे १) लॉकडाउनमध्ये २०% वेतन देण्यात आले होते ते आता ४०/५० % पर्यंत देण्यात येईल, २) कंपनी मधील कोणत्याही कामगाराला काढून टाकण्यात येणार नाही, ३) अधिक वेळ काम करणाऱ्या कामगारांना ओव्हर टाइम आणि उपहाराची व्यवस्था यांसह करण्यात यावी. आणखी काही मागण्या केल्या होत्या. तेव्हा निलेश (आप्पा) पराडकर यांनी कामगारांच्या तक्रारी ऐकूण घेतल्यावर निलेश पराडकर यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी तसेच कंपनीच्या मालकाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या मान्य करून घेतल्या.

यावेळी निलेश (आप्पा) पराडकर, घनश्याम नाईक, विजय गवळी, जितेंद्र कांबळी, अपूर्वा प्रभू, विवेक गडकरी, प्रशांत जांभळे, शुभम ओंबळे, अनिल जांभळे, मंगेश पानसे, अनिल पांगत, यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

™© Copyright - dont copy this text™