- हक्कासाठी आंदोलन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्यसाधून सार्वजनिक पाणपोईचे आयोजन..

रसायनी : प्रतिक चाळके
देशासह राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. सरकारने रायगड जिल्हा हा ऑरेंज झोन म्हणून घोषित केल्याने रसायनीमध्ये मोहोपाडा बाजारपेठेत नागरिकांची सामान, फळभाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
तसेच रसायनी परिसरातील मोहोपाडा बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असल्याने रसायनी परिसरातील नागरिक तसेच भाजीवाले मोहोपाडा येथे बाजार करण्यासाठी येत असतात. मे महिना म्हटलं की "कडक ऊन". साधारण ४०/४५ अंश तापमान हा असतोच. अश्या कडाक्याच्या उन्हामध्ये बाजारपेठेतील नागरिकांसाठी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड हे दर वर्षी ५ मे रोजी त्यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक पाणपोईचे आयोजन करत असतात. मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी तसेच विक्रीसाठी आलेल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गौरसोय होऊ नये म्हणून या सार्वजनिक पाणपोईचे आयोजन करण्यात येत असते.
यावर्षी कोरोना विषाणूमुळे सर्वत्र ठिकाणी लॉकडाउन परिस्थिती असल्यामुळे प्रकाशशेठ गायकवाड यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत तसेच सरकारच्या नियमांचे पालन करत समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांनी सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा १४ मे २०२० रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक पाणपोईचे आयोजन केले. या सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन रसायनीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रसायनीमधून परराज्यात जाणाऱ्या ७०० मजुरांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील सम्यक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांच्याद्वारे करण्यात आली.
2020 सालाची सुरुवात ही कोरोना विषाणूच्या काळ्या सावटाखाली सुरु झाली. मात्र समाजकार्यात नेहमीच प्रणित असलेले प्रकाशशेठ गायकवाड यांची समाजकार्याची प्रकाश ज्योत कोरोनाच्या अंधारात सुद्धा गरजु गरिबांना किराणा सामान व जीवनावश्यक वस्तु पुरवत तेजीने लख्ख प्रकाश देत राहिली.
त्याचप्रमाणे आज दि. 14 मे रोजी मोहोपाडा बाजारपेठेत सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटनासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे, उपनिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस कर्मचारी उज्वला पाटोळे, संदीप पाटील, माजी सरपंच संदीप मुंढे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड, म.न.से रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, सरपंच ताई पवार, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड, रत्नाकर पगारे, मामा कांबळे, सुनील निकाडे, दीपक इंगळे, अजित कडलक, प्रथमेश कांबळे, वैशाली गायकवाड, एस. पी.गायकवाड यांच्यासह सम्यक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.