- हक्कासाठी आंदोलन
चोवीस तासाच्या अहवालात 75 पोलिसांना कोरोनाची लागण

आंदोलन : प्रतिनिधी
राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 75 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाशी लढताना या साथीच्या आजाराची लागण रोखणं हे महाराष्ट्र पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.
गेल्या चोवीस तासात भर पडलेल्या पोलिसांच्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1हजार 964 वर पोहोचली आहे.
तर एकूण 20 पोलिसांचा आजवर कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर एकूण 849 पोलीस या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
दरम्यान; आता पर्यंत एक हजाराहून अधिक पोलीस रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
46 views0 comments