• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

चारदिवसाच्या बंद नन्तर चौक मध्ये गर्दी


चौक : अर्जुन कदम

ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० पर्यंत केलेला जनता कर्फ्यु सम्पल्यावर आज चौक मध्ये गर्दी झाली होती.

भिंगार ता.पनवेल येथे कोरोना रुग्ण सापडल्याने व हे गाव चौक पासून काही किमी. अंतरावर असल्याने त्याची बाधा चौक परिसरात होऊ नये म्हणून ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी चार दिवस दूध व मेडिकल सोडून सर्व बंद केले होते.आज चौक सुरू झाल्याने परिसरातील अनेक गावातून गिर्हाईक चौक बाजारपेठ मध्ये दिसत होते.आज भाजीपाला कमी होता,काही भाजीच्या गाड्या न आल्याने बरीच भाजीची दुकाने बंद होती.गावातून भाजी विक्रीसाठी येणारे देखील कमी झाले आहेत.मात्र चिकन-मटण व मच्छी दुकानात रांगा होत्या.चिकन मटण चा भाव वधारला होता.अनेक किराणा दुकानात गर्दी होती,पण बऱ्याच जिन्नस सम्पल्या आहेत,वाशी मार्केट बंद करण्यात आल्याने किराणा येणे कठीण आहे.चौक ची पोलीस यंत्रणा नजर ठेवून होतीच,पण बाजारपेठ मध्ये त्यांचा फेरफटका सुरू होता.बाजारपेठ ची वेळ स.८ ते १२ वाजेपर्यंत असल्याने गर्दीत खूप घाई होताना दिसत होती.