• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

चौक मंडळात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 388 तर आतापर्यंत एकुण मयत -11

बुधवार चौक मंडळात नविन 10 रुग्ण, चौक मंडळात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 388 चौक मंडळात आतापर्यंत एकुण मयत -11रसायनी : प्रतिनिधी बुधवार दिनांक 29 जुलै 2020 रोजी चौक मंडळात नविन 10 कोरोना बाधित रुग्ण मिळाले असून चौक मंडळात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 388 झाली आहे. आतापर्यंत एकुण मयत संख्या 11 झाली आहे. बुधवारी मिळालेल्या माहिती नुसार चौक महसूल विभागात 10 रुग्ण वाढल्याने एकूण रुग्ण संख्या 388 झाली झाली आहे. बुधवार चौक मंडळातील रिस 5, कैरे 3, वासांबे 2, असे 10 एकुण कोरोना बाधित रुग्ण मिळाले असल्याची सदरची माहिती चौक मंडळ अधिकारी नितीन परदेशी यांच्या कडून प्राप्त झाली असून चौक मंडळातील जनतेने शासनाच्या नियमाप्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.