- हक्कासाठी आंदोलन
चौक मंडळात कोरोना ची पुन्हा उसळी

चौक : अर्जुन कदम
गेले दोन ते तीन दिवस कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना आज त्याने टीबल उसळी घेतल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी चौक महसूल मंडळात कोरोनाग्रस्त संख्या पाच वर आल्याने या परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले होते, सर्व यंत्रणा व नागरिकांचे सहकार्य मिळाले असल्याचे दिसत असताना आज पाच ची संख्या पंधरा झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रिस २, नवीन पोसरी ४, खाणे आंबिवली १, लोधीवली २, कलोते मोकाशी १, चौक २, लोहोप १, तळेगाव १, वाशिवली १ असे १५ नवीन रुग्ण आढळल्याने सर्वांनी मिळून काळजीपूर्वक परिसरात सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.सर्व जनतेने सुरक्षित रहावे असे आवाहन तलाठी अमोल बोराटे यांनी केले आहे.
45 views0 comments