• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

चौक बाजारपेठ मध्ये दंड आकारणी सुरू


चौक : अर्जुन कदम

चौक बाजारपेठ मध्ये ज्या दुकानदार यांनी दुकानासमोर बांबूचे कठडे उभे केले नाहीत अशा चार दुकानदार यांच्यावर ग्रामपंचायत चौक यांनी दण्ड आकारला आहे:.

चौक ही ग्रामीण भागातील सर्वात मोठी व ऐतिहासिक वारसा लाभलेली बाजारपेठ आहे.नियमितपणे चाळीस गावातील लोक या बाजारपेठ मध्ये खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात, या ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तहसीलदार इरेश चप्पलवार,सपोनि संजय बांगर,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे,ग्रामपंचायत चौक व तुपगाव,जेष्ठ नेते तात्या कापरेकर,अशोक पटेल आदींनी व्यापारी असोसिएशन,सर्वप्रकारच्या व्यापारीवर्ग व नागरिक यांची संयुक्त बैठक घेऊन काही नियम तयार केले होते,पण काही फरक जाणवत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या भाषेत समजावून सांगितल्यावर बाजारपेठ सुरळीत सुरू होती,पण काहीही काम नसणारे खोटी करणे सांगून हालहलाव बघण्यासाठी येत असत,दरम्यान तुपगाव महिला कर्मचारी यांच्या पतीचा अहवाल व मोहपाडा येथे पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.पनवेल येथे बाजारात जाणारे चौक दिशेला वळल्याने  चौक मध्ये गर्दी वाढू लागली,त्यामुळे पोलीस,महसूल व ग्रामपंचायत यांच्यावर ताण वाढू लागला,यामुळे व्यापारी व गिर्हाईक यांच्यात सोशल डिस्टन्स व अन्य नियमांची पायमल्ली होऊ लागली.याचा कडक विचार करून व्यापारी असोसिएशने एक बैठक आयोजित करून ग्रामपंचायत चौक च्या माध्यमातून दंडात्मक कारवाईची सुरुवात केली.आज सोशल डिस्टन्स न पाळणारे व दुकानशेजारी बांबूचा अडथळा न उभा करणारे आशा  चार दुकानदार यांच्यावर कारवाई केल्याने आज चौक मध्ये कोरोना विरोधातील खरी लढाई सुरू झाली आहे.