• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

चौक बाजारपेठमध्ये आग लागून नुकसान झालेल्या घरांची आमदार महेश बालदी यांच्याकडून पहाणी


जळीत घरांची पहाणी करताना आमदार महेश बालदी. छाया - अर्जुन कदम


चौक : अर्जुन कदम

चौक बाजारपेठमध्ये आग लागून नुकसान झालेल्या घरांची पहाणी उरण विधानसभा मतदारसंघा चे आमदार महेश बालदी यांनी पहाणी करून जळीतग्रस्तांना धीर दिला.

काल दुपारी चौक बाजारपेठ मधील अनंत,चंद्रकांत व चित्तरंजन या चौधरी बंधुच्या दुकानांना आग लागून दोन दुकाने पूर्णपणे  खाक झाली.आज उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली.शासन नियमात दुकानासाठी मदत मिळत नाही,पण जळीत घराला मदत मिळते.शासन स्थरावर या जळीतग्रस्त कुटुंबाला जास्तीजास्त मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगून तात्पुरती मदत देण्यात येईल असे सांगितले.