• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

चौक परिसरात निसर्गा'चा तडाखा

चौक परिसरात निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज यंत्रणेचे मोठे नुकसान, घरांची पडझड


चौक : रोहिदास ठोंबरे

चक्रीवादळाचा खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील अनेक गावांना फटका बसला आहे.अनेक ठिकाणी शाळांचे पत्रे, घराचे छप्पर, झाड कोसळणे, विजेचे खांब पडणे आदी प्रकारचे नुकसान दिसून आले आहे.अनेक गावांत घरांवरील पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरांची पडझड झाली आहे.चौक मध्ये मुख्य बाजारपेठेत श्री राम मंदिराच्या समोरील झाड मुख्य रस्त्यावर पडला त्याकरणाने वाहतूक थोडी वेळ विस्कळीत झाली होती.

सकाळपासून सुरू असलेल्या निसर्ग वादळाच्या थैमानात विजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे.चौक मध्ये व चौक च्या परिसरातील गावांत मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार विजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.दरम्यान वादळामुळे महावितरणच्या विजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात नुकसान झाले आहे.महावितरणाचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरूस्तीचे कामे करीत आहेत.