• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

घरातच राहून स्व:ताची आणि कुटूंबाची काळजी घ्या --भाई गायकर

घरातच राहून स्व:ताची आणि कुटूंबाची काळजी घ्या

------भाई गायकरकर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे -

जगात कोरोनाने हाहाकार उडाला असून या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपाययोजना अंमलात आणत आहे.कोरोनाचे सर्वांधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळून येत असल्याने लाॅकडाऊन , संचारबंदीची परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने एकदिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि घरात राहून स्व:ताची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी केले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण सर्वांधिक सापडत असल्याने कोरोनाला हरविण्यासाठी स्थानिक प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा संसर्गं होवू नये यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर वापरावे, हात वारंवार साबणाने धुवावेत, स्वच्छता राखावी, आपले कपडे रोजच्यारोज धुवावे असे सांगून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी केले आहे.

दरम्यान डाॅक्टर्स, नर्स, पोलिस यंत्रणा, शासकीय अधिकारी, पत्रकार, सफाईं कामगार आदी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांपर्यंत कोरोना पोहचू नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याचे सर्वांनी भान ठेवून आपल्या घरातच राहावे असे, आवाहन भाई गायकर यांनी केले आहे.यावेळी भाईनी नागरिकांचे कोरोनापासून बचाव करणा-यांचे व लाॅकडाऊन काळात गरजू गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणा-या दानशूरांचेही आभार मानले.तसेच त्यांनीही मोफत अन्न धान्य वाटून खारीचा वाटा उचलला असल्याचे दिसण्यात येत आहे.

21 views0 comments