- हक्कासाठी आंदोलन
ग्रामपंचायत निधीतून अन्नधान्य वाटप
ग्रामपंचायत निधीतून अन्नधान्य वाटप

चौक : अर्जुन कदम
लोकांच्या मागणीनुसार तुपगाव ग्रामपंचायत ने १५% मागासवर्गीय व ५% अपंग निधीतून धान्य वाटप केले.
लॉकडाऊन च्या काळात सर्व उद्योगधंदे बंद असून सर्वात जास्त फटका रोजनदारीवर काम करणारे यांना बसला आहे. काही संघटना यांनी आदिवासी व मागासवर्गीय यांच्या १५% निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना कळविले होते.ग्रामीण भागातील सर्वच रोजनदारीवर काम करीत आहेत.त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून ग्रामपंचायत तुपगाव यांनी त्यांच्या मागील व चालू आर्थिक वर्षातील १५% मागासवर्गीय व ५% अपंग निधीतून धान्य वाटप केले.
(सरपंच महेश परीट,शरीफ भालदार,ग्रामसेवक सचिन कुराडे धान्य वाटप करताना)
छाया - अर्जुन कदम