• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

ग्रुप ग्रामपंचायत तुराडे च्या उपसरपंच पदी शीतल प्रकाश माळी यांची बिनविरोध निवडरसायनी : गौतम सोनावणे

ग्रुप ग्रामपंचायत तुराडे च्या उपसरपंच पदी नुकतीच कुमारी शीतल प्रकाश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तुराडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षल पठारे यांनी उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्या नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच चंद्रकांत भोईर व ग्रामसेवक अस्मिता मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 31जुलै 2020 रोजी निवडणूक घेण्यात आली.

यावेळी सर्वानुमते शीतल प्रकाश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सरपंच चंद्रकांत भोईर व ग्रामसेविका अस्मिता मोकल यांच्यातर्फे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शीतल माळी यांची उपसरपंच पदी निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. नवनिर्वाचित उपसरपंच शितल माळी यांना शुभेच्छा देण्यासाठी जि.प सदस्य राजू पाटील, पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, मा. सरपंच संदीप मुंढे, माजी उपसरपंच संदेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश वर्तक, मा. सरपंच विजय मुरकुटे, योगेश मुरकुटे, प्रकाश गाताडे, विश्वनाथ गायकवाड, युवा कार्यकर्ता मयुर ठाकुर, सा.कार्यकर्ता अविनाश वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भेट दिली.