• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गोरगरीब रुग्णांसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सेवा खुली करण्याची गरज !

गोरगरीब रुग्णांसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सेवा खुली करण्याची गरज !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे कोरोना विषाणू संसर्ग महामारीचा एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे . याकाळात शासनाने जनता कर्फ्यू , लॉकडाऊन , संचारबंदी , अशी अमलबजावणी करून नागरिकांची सुरक्षा करत या कोरोना महामारीस प्रतिबंध केला . त्यामुळेच कर्जतमध्ये कोरोना विषाणूचा एकही रुग्ण पाहण्यास मिळाला नाही . या दरम्यान इतर आजारांच्या अनेक रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय बंद होते , फक्त तातडीचे रुग्ण तपासण्याची सोय होती , त्यामुळे अनेक रुग्ण पैशाअभावी उपजिल्हा रुग्णालयात येऊन माघारी जात होते . खाजगी रुग्णालयाची फी भरण्यास पैसे नसल्याने मेडिकलमधून बिना डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घेऊन जात होते , मात्र अशा गोळ्यांचा विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असल्याने , गोरगरीब नागरिकांसाठी निदान आता तरी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील ओपीडी सेवा खुली करावी , अशी मागणी जनतेतून होत आहे . कर्जत शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या वर आहे . यांत बहुसंख्य नागरिक हे गोरगरीब , हातावर कमावणारे , आदिवासी , मजूर आहेत , हे सर्व नागरिक हातावर कमावून पोट भरणारे असल्याने या कोरोना महामारीच्या काळात त्यांची रोजगार अभावी खूपच दयनीय अवस्था झाली . खाण्यापिण्यावाचून प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे बारीक - सारीक आजारांसाठी उपचार घेण्यास उपजिल्हा रुग्णालयात गेल्यावर फक्त कोरोनासाठी , व अति आजाराचेच रुग्णांना तपासत असल्याचे सांगून छोट्या आजारांवर मेडिकलमधून गोळ्या घ्या , असा सल्ला दिला जात होता . मात्र आता एक महिन्याचा कालावधी झाला असल्याने व कोरोना बाधित एकही रुग्ण कर्जतमध्ये आढळला नसल्याने सुरक्षितता अबाधित असल्याची परिस्थिती आहे . त्यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी ओपीडी चालू केल्यास त्यांचे बारीक - सारीक आजार बरे होऊ शकतात , तसेच बाहेर उपचार घेण्यास त्यांच्याकडे पैसे नसल्याने व मेडिकल मधील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या गोळ्या शरीराला हानिकारक ठरू शकतात , म्हणूनच उपजिल्हा रुग्णालय खुले करून ओपीडी रुग्णांना बारीक - सारीक आजारांवर उपचार होऊन गोळ्या - औषधे मिळावीत अशी गरज या कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळात येऊन ठेपली आहे, तरी शासन दरबारी याचा विचार व्हावा , हि मागणी जोर धरू लागली आहे .

79 views0 comments