• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे युवा नेते नितीनदादा पाटील यांच्याकडून वाटप

युवा नेते नितीनदादा पाटील यांच्याकडून कसळखंड ग्रामपंचायत व पोयंजे पंचक्रोशीतील गरजू गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप..रसायनी : राकेश खराडे

कोरोना (कोविड -१९)या विषाणुच्या संसर्गांमुले संपूर्ण देश भितीच्या वातावरणात आहे. यातच महाराष्ट्रातील मुख्य शहरांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील स्थिती गंभीर होत चालली आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी नोटीफिकेशनव्दारे दोन आठवडे वाढविला असून तिसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी चार मे पासून होणार आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या गरजु व गोरगरिब जनतेला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची काळजी वाटू लागली आहे. यातच हातावर पोट भरणा-यांची अवस्था दोरी तुटलेल्या पतंगासारखी झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पोयंजे पंचायत समिती विभागातील शिवसेनेचे युवा नेते नितीनदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कसळखंड ग्रामपंचायतमधील अरिवली, आष्टे, शिवाजीनगर, फणसवाडी या सर्व गावांत घरोघरी धान्यासह किराणा सामानाचे किट वाटप केले तसेच पोयंजे पंचायत समिती विभागातील पोयंजे आदीवासीवाडी, पालीची वाडी, बारवई आदीवासीवाडी, खानावले आदीवासीवाडी आदी वाड्यांत आदीवासी कुटुंबांना घरोघरी जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. याचबरोबर भाडेतत्त्वावर राहणा-या नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप शिवसेनेचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते नितिनदादा पाटील यांच्यावतीने करण्यात आले.

पोयंजे पंचायत समिती विभागातील गरजू गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून युवा नेते नितीनदादा पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व गोरगरीब १३५० कुटूंबाना धान्यासह किराणा सामानाच्या किटचे वाटप केले. लाॅकडाऊन कालात युवा नेते नितीनदादा पाटील यांच्याकडून कामगारवर्ग, गोरगरीबांना धान्यासह किराणा सामानाच्या जिवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरुच आहे.वाटपप्रसंगी सोशल डिस्टिंक्शनचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे पहावयास मिळाले. यावेळी माज़ी सरपंच तथा पनवेल तालुक़ा संपर्क प्रमुख अनंताशेठ पाटील माजी उपसभापती देविदास पाटील, सरपंच तथा उपतालुकाप्रमुख जगदीश मते, पोयंजे उपविभागप्रमुख किशोर पाटील, अशोक ठाकूर, बारवई शाखाप्रमुख नरेश पडवल, अनंता पाटील, राजेश पडवल, दामोदर पाटील, भास्कर पाटील, महादेव पाटील,सुरेश नाईक, सुनील पाटील, गिरीश पाटील, दिलिप पाटील, रोहिदास मते, संदिप मते, महेश शेडगे, संदिप ठाकूर, रोशन शितकणगे, कैलास पाटील आदींसह कसलखंड व पोयंजे पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवा नेते नितिनदादा पाटील यांनी स्वत:ची काळजी घेत सरकारच्या आदेशाचे पालन करुन लाॅकडाऊन काळात घरात राहण्याचे आवाहन केले. लाॅकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोणावरही उपाशी राहण्याची वेळ आली तर संपर्क करण्याचे आवाहन कसळखंड गावातील नितिनदादा पाटील यांनी केले आहे.

26 views0 comments