• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गुड शेफर्ड इंग्रजी शाळेने कोरोनामुळे शैक्षणिक शुल्क भरण्यास सवलत देण्याची गरज !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत शहरातील गुंडगे भागात असलेली गुड शेफर्ड इंग्रजी शाळा १५ जून पासून चालू होणार आहे . या शाळेत विद्यार्थ्यांना नवीन ऍडमिशन शुल्क तसेच रेग्युलर विद्यार्थ्यांना भरावी लागणारी शुल्क कोरोना विषाणू महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे कुणाकडेही पैसे नसल्याने वेळेवर भरणे शक्य होणार नाहीत त्यामुळे यांत सवलत दिल्यास पुढील काळात पालक मानसिक तणावाखाली रहाणार नाहीत , म्हणून शैक्षणिक शुल्क भरण्यास सवलत मिळण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे .

गुड शेफर्ड इंग्रजी शाळेत गरीब कामगार वर्ग , हॉकर्स , छोटे व्यापारी , हातागाडीधारक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे पाल्य इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात .भविष्यात आपला पाल्य इंग्रजी भाषा शिकून आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात तसेच स्पर्धेच्या पिढीत अग्रेसर रहावे , अशी पालकांची ईच्छा असते . मात्र या शाळेतील शिक्षण महाग झाले असल्याने पालकांना ते न परवडण्यासारखे झाले आहे , हि शिक्षण संस्था अतिरिक्त डोनेशन च्या नावाने भारी भरकम रक्कम पालकांकडून घेत असून या शाळेविरुद्ध कोणीही " ब्र " शब्द देखील काढत नाहीत , सुरुवातीला प्रवेशाची रक्कम व वर्षाकाठी भरमसाठ फी , यामुळे पालकांचे कंबरडे चांगलेच मोडकळीस येत आहे .त्यामुळे या शाळेविरोधात पालकांमध्ये नेहमीच संतापाचे वातावरण असते.

आपला पाल्य छोट्याश्या वयात नर्सरीत जाताना व बोबडे इंग्रजी बोल ऐकताना पाल्यांना खूप आनंद होतो .नवीन ड्रेस ,गळ्यात टाय व फोटो आय डी कार्ड ,पायात सॉक्स व बूट ,बारीक केसांची कट ,असं आपल्या पाल्याचे रूप बघून पालकांना खूपच हायसे वाटते .त्यातच आपला पाल्य देखील इतरांच्या बरोबर इंग्रजी शिकून या स्पर्धेच्या युगात भविष्यात गरुड भरारी घेईल , ही एकमेव इच्छा उराशी बाळगून अनेक गरीब पालक आपल्या ऐपतीच्या बाहेर जाऊन खर्च करून आपल्या पाल्याला इंग्रजी शिक्षण देताना दिसत आहेत .त्यामुळे सुरुवातीला मुबलक असणारी प्रवेश फी आत्ता चाळीस हजारा पर्यंत पोहचली असून मासिक फी देखील एक हजाराच्या घरात गेली आहे .शाळेचा ईतर खर्च पालकांना परवडणारे नाही तरी देखील आपला पाल्य इंग्रजी भाषेत पारंगत असावा ,अशीच इच्छा पालकांची आहे ,आणि नेमका ह्याचाच फायदा शाळेने आजपर्यंत घेतला आहे .गोर गरिबांसाठी उदयास आलेली या शाळेने आत्ता नवीन इमारत बांधली आहे .प्रवेश करणाऱ्या पालकांकडून इमारत निधी सतरा हजार तर ऍडमिशन फी ,ट्युशन फी ,टर्म फी ,जिमखाना फी ,काऊशन मनी ,एक्झामिनाईशन फी ,लायब्ररी फी ,ई-लर्निंग आदी फी ची रक्कम अठरा हजारापर्यंत होत असून नोटबुक -पुस्तक-व शाळेचा युनिफॉर्म मिळून एकूण खर्च चाळीस हजाराच्या घरात तर रेग्युलर विद्यार्थ्यांना आठ ते दहा हज़ार खर्च जात असल्याने सध्या गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कुल ही गरिबांची शाळा राहिली नाही , तर या शाळेत एस.सी ,एस.टी ,एन.टी., व ईतर जातीला शाळेत प्रवेशासाठी कुठल्याही आरक्षित जागा नसल्याचे अनेक पालकांनी तक्रारी केल्या आहेत .त्यामुळे या शाळेबाबत पालकांमध्ये संतापाचे वातावरण असते . मात्र आता कोरोना विषाणू महामारीचा काळ असल्याने या तीन महिन्यात सर्व व्यवहार बंद झाल्याने गाठीशी कुणाकडेही पैसे नाहीत , तर उसनवारी , व्याजी कर्ज , उधारी हि वाढलेली असताना वाढीव शाळेचा खर्च न झेपणारा असल्याने शाळेच्या फी भरण्यास गुड शेफर्ड कॉन्व्हेंट शाळेच्या संस्थेने सवलत द्यावी , अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .