• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गुंडगे येथे गरजू लोकांना शिधा वाटप, कोरोना विरोधातील लढाईत लालधारीशेठ पाल यांचा खारीचा वाटा !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू संसर्ग विरोधातील लढाईत गोरगरीब , गरजू , हातावर पोट भरणारे , तसेच आदिवासी बांधवांना दोन वेळेचे पोट भरून अन्न मिळाल्यास प्रतिकारशक्ती वाढून कोणीही कोरोना बाधित होणार नाही , म्हणून अनेकांनी मदतीचा हात देऊन या कष्टकरी बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. गुंडगे प्रभागात दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेले माजी उपनगराध्यक्ष लालधारीशेट पाल हे नेहमीच सर्वांच्या गरजेला उपयोगी पडतात त्याप्रमाणे यावेळीही त्यांनी एक हात मदतीचा देऊन गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोना विरोधातील लढाईत खारीचा वाटा उचलला.

आज दिनांक ८ मे २०२० रोजी माजी उपनगराध्यक्ष श्री.लालधारीशेठ पाल यांनी गुंडगे गावात घरोघरी जाऊन गोरगरिब- गरजू - कष्टकरी - लोकांना कोरडा शिधा वाटप केला.कोणताही गाजावाजा न करता लोकांच्या दारात जावुन सन्मानाने गरजूंना मदत केली आहे.आता पर्यंत एकंदरीत संपुर्ण गुंड़गे गाव , पंचशीलनगर , जुने एस टि स्टँड व परिसरात टप्प्या टप्प्याने सुमारे ४०० नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले . प्रत्येक वेळेस अडीअडचणीला गुंडगे प्रभागात ते सर्वांना मदत करतात अशी त्यांची ओळख आहे .मग अश्या संकट समयी ते मागे कसे राहतील , यापुढेही ते अशीच मदत करणार आहेत . यावेळी अजय पाल यांचे हस्ते सर्व गरजवंतांना वस्तूंचे वाटप केले , प्रभागातील आज त्यांचा शेवटचा टप्पा होता .यावेळी सोबत माजी नगरसेवक श्री.दिपक मोरे , सुनिल परदेशी,आनंद घोड़के , विकास भालेराव ( जॅकी ) ,साहिल मोरे , मनिष मोरे आदी वस्तू वाटप करण्यास होते .गोरगरिबांना मदतीला धावणारे माजी उपनगराध्यक्ष लालधारीशेट पाल , व अजय पाल यांचे कौतुक करत माजी नगरसेवक दीपक मोरे यांनी गुंडगे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले .