• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गुंडगे ठाकूरवाडी येथे गोपाळ दाबणे यांच्या घराचे पत्रे वादळ वाऱ्याने उडाल्याने प्रचंड नुकसान!


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

वातावरणात अती गर्मीमुळे बिघाड झाला असल्याने कधी कडाक्याचा ऊन तर कधी वादळी वारा तसेच पाऊस पडत असल्याने नागरिकांचे यामुळे नुकसान होत आहे . गुंडगे ठाकूरवाडी येथे आज दुपारी वादळ वारा सुटल्याने गोपाळ दाबणे यांच्या घराचे पत्रे उडून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .

गुंडगे ठाकूरवाडी येथे रहाणारे गोपाळ दाबणे हे मासेमारीचा व्यवसाय करून आपला उदारनिर्वाह करतात . आज दि . ४ मे २०२० रोजी दुपारी ठीक १ वाजता सोसाट्याचा वादळ वारा आला , या वादळात त्यांच्या घराचे पत्रे उडाले . यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून या कोरोना महामारीच्या काळात ते घरीच असून हाताला काम नसल्याने गाठीशी पैसे देखील नाहीत , त्यामुळे घरावरचे उडालेले पत्रे कसे बसविणार , पावसाळा तोंडावर आला असल्याने या चिंतेत ते असून शासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी , अशी मागणी गोपाळ दाबणे यांनी केली आहे . सदरची परिस्थिती स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड व माजी नगरसेवक दीपक मोरे यांनी बघितली असून नगरसेवक उमेश गायकवाड यांनी त्यांना तातडीने अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे , इतर लोकप्रतिनिधींनी देखील मदत करावी असे एकंदरीत चित्र असून झालेल्या नुकसानीची शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी दाबणे यांनी आजी - माजी नगरसेवक यांच्याकडे केली आहे .यासाठी शासनाकडून सर्वतो मदत मिळण्यास सहकार्य करू , असे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी आश्वासन दिले आहे .

8 views0 comments