• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गव्हाण गावाची गावबंदीची मागणी

पनवेल प्रतिनिधी : डॉ. अशोक म्हात्रे

कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता उरण तालुक्यामध्ये सुद्धा कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने उरण तालुक्यातील गव्हाण गावाने गावबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत आणि न्हावा-शेवा पोलीस स्टेशनमध्ये परवानगी मागितली आहे.

उरण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने काही गावांमध्ये गावबंदी केली असून गव्हाण ह्या गावाची लोकसंख्या जास्त असून तेथील नागरीक दाटीवाटीने राहत असतात. गव्हाण गावाच्या बाजूच्या गाववाल्यांनी त्यांच्या गाव हा पूर्णपणे बंद केला असून जासई, उलवेनोड येथे कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने तिथले नागरिक गव्हाण गावात बाजारपेठ करण्यासाठी येत असून गर्दी करत असतात. त्यामुळे गव्हाण गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर वरळी कोळीवाड्यापेक्षा भयाण परिस्थिती निर्माण होऊ शकते. गावालागत असलेला मेन रोड हा चालू ठेऊन गावामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी रस्ता हा चालू ठेऊन परंतु बाहेरील नागरिक गावामध्ये न येणासाठी गव्हाण गावात ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवेश आहेत त्या- त्या ठिकाणी गावाचा रस्ता बंद करण्याची मागणी गव्हाण ग्रामस्थांनी केली आहे.