• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

गरजू गोरगरिब कुटूंबाना धान्यासह किराणा सामान वाटप करुन जपली सामाजिक बांधिलकी


रसायनी : राकेश खराडे

कोरोना (कोविड -१९)या विषाणुच्या संसर्गांमुळे संपूर्ण देश भितीच्या वातावरणात आहे. यातच महाराष्ट्रातील मुख्य शहरांत कोनोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असल्याने राज्यातील स्थिती गंभीर आहे.यावर उपाययोजना म्हणून सरकारने पाचवा लाॅकडाऊन प्रतिबंधित क्षेत्रासाठी 30 जूनपर्यंत लागू केला आहे.यामुले गरजू व गोरगरिब जनतेला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची काळजी वाटू लागली आहे.यातच हातावर पोट भरणा-यांची अवस्था दोरी तुटलेल्या पतंगासारखी झाली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात गोरगरिब भरकटला आहे.यातच सम्यक सामाजिक संघटनेच्यावतीने लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच रसायनीत गरजू गोरगरीबांना धान्यासह किराणा सामान,अन्नदान करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सम्यक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्याकडून केला जात आहे.परीसरातील गरजू गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी समाजसेवक प्रकाश गायकवाड यांनी लाडीवली ,शिवनगर वाडी,आकुलवाडी बौध्दवाडा येथील गरजू व गोरगरीबांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.या वाटपप्रसंगी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्यासोबत सचिव संदीप निकाडे, अजित कडलक,विजय बनसोडे,पाचपिंडे,जावले आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सर्वांनी सोशल डिस्टिंक्शनचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वता:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन समाजसेवक प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.


29 views0 comments