• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर तालुक्यामधून ८०० मजुरांना नियोजन आणि शिस्तबद्ध उत्तरप्रदेशला पाठविण्यात आले.


ह.आंदोलन : प्रतिनिधी

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद देऊन महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना मायदेशी परतण्यासाठी विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव प्रशांत गायकवाड यांनी परप्रांतीय मजुरांना मायदेशी परतण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था व्हावी. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री यांनी योग्य ती अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

खालापूर तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना मायदेशी परतण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवर यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव प्रशांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याने परप्रांतीय मजुरांना मायदेशी जाण्यास मदत केली.

यावेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड यांनी बिस्किट आणि बिसलेरी पाण्याची बॉटल यांचे वाटप केले. यावेळी रसायनी रायगड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर सुखदरे, युवानेते श्रीकांत खंदारे, NSUI चे तालुका अध्यक्ष कुणाल जाधव, शायन उसमानी, अनिरुद्ध ठोंबरे, कृष्णा झोबांडे, हेमंत गायकवाड, दिवेश पाटील, यांच्यासह रसायनी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.