• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर तालुक्यातील ४५ अंगणवाडी वादळग्रस्त झाल्या, चार चे पूर्ण नुकसान


वादळाने नुकसान केलेल्या अंगणवाडी ची पहाणी करताना प्रकल्प अधिकारी (छाया-अर्जुन कदम)


चौक : अर्जुन कदम

निसर्गचक्री वादळाने खालापूर तालुक्यातील ४५ अंगणवाडींचे नुकसान झाले असुन चार चे पूर्ण नुकसान झाले आहे,त्यांच्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

३ जून रोजी निसर्गचक्री वादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते,यात अनेक प्रकारचे नुकसान झाले असून मुख्यमंत्री ते अनेकांनी त्याची पहाणी केली.खालापूर तालुक्यातील २०४ अंगणवाडी पैकी ४५ वादळग्रस्त झाल्या आहेत,यातील जांबरुंग ठाकूरवाडी,सोंडेवाडी,खरीवली आदिवासीवाडी व ठाणेन्हावे मोहल्ला या चार अंगणवाडी चे पूर्ण नुकसान झाले आहे.दहा अंगणवाडी च्या दुरुस्तीसाठी पंचायत समिती खालापूर व बालविकास प्रकल्प यांनी सरपंच यांना कळवून आपल्या स्थरावर दुरुस्ती करण्यासाठी कळविले आहे.३१ अंगणवाडी दुरुस्तीचे प्रस्ताव एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खालापूर यांच्याकडून जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे सादर करण्यात येत आहेत.अशी माहिती एस.पी.चांदेकर बालविकास प्रकल्प अधिकारी(प्रभारी) खालापूर यांनी दिली.