• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर तालुक्यातील पारले कंपनीच्या वतीने जिल्हा प्रशासनाचा सन्मान..


खालापूर : प्रसाद अटक

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात किरखंडी येथील पारले कंपनी व्यवस्थापन यांच्या वतीने रायगड जिल्हा प्रशासनाला विशेष सन्मानित करण्यात आले.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा होत असल्याने राज्यसरकार व प्रशासन हे सतर्क असून कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज झाले आहे. तसेच रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी देखील रायगड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे नियोजन केले. दिवस रात्र प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. तसेच

सामाजिक बांधिलकी जपत पारले कंपनी व्यवस्थापन चे किशोर शेळके यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे सह खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांना देखील सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.