• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्याची युवा नेते प्रशांत गायकवाड यांची मागणी


रसायनी : गौतम सोनावणे

सध्या खालापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून खालापूर तालुक्यात covid-19 सेंटरची उभारणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केले आहे. सध्या खालापूर तालुक्यात मोहोपाडा पाताळगंगा रसायनी परिसरात कोरोना संसर्ग वाढत आहे. या परिसरात कारखानदारी असल्यामुळे बाहेरून येणारे कामगार जास्त प्रमाणात ये-जा करीत असल्यामुळे परिसरात कोरोना विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसत असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सर्व स्तरातून ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना चित्र दिसत आहे. या कोरोना विषाणूच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना पनवेल, पेण या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. सध्या रुग्णांची संख्या पाहता त्या ठिकाणी रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे यामुळे प्रशांत गायकवाड यांनी आपल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मागणी केली आहे. की, खालापूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. यामध्ये रसायनी विभागातील जनता विद्यालय मोहोपाडा, पिल्लई कॉलेज, जे.एच.एच अंबानी शाळा, सावरोली हिरानंदानी इस्टेट याठिकाणी सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.