• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूर तालुका नाभिक तरुण संघाच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर


खालापूर : प्रसाद अटक

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) रोगाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सरकार ह्या लढ्याला जशास तसे उत्तर देत आहे. परंतु सर्वत्र लॉकडाउन परिस्तिथी असल्याने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. यामुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

खालापूर तालुक्यातील हातावर पोट भरणाऱ्या नाभिक समाजातील व्यावसायिकांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली असून नाभिक समाजातील व्यावसायिकांनी सरकारच्या सुचनेचे पालन करून आपले दुकान हे बंद ठेवले आहेत. परंतु लॉकडाउन हा वाढतच असल्याने नाभिक समाजातील व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळत चालली आहे.

तसेच या लॉकडाउनच्या काळात नाभिक समाजाकडे प्रशासनासह विविध क्षेत्रातील अन्नदात्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्याने खालापूर तालुक्यातील नाभिक समाजाने व्यवसाय चालू करण्यासाठी पालकमंत्री कु.आदीतीताई तटकरे यांना निवेदन लिहले असून सदरचे निवेदन खालापूर तालुक्याचे तहसीलदार श्री. इरेश चप्पलवर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नाभिक तरुण संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रकाश जलगावकर, उपाध्यक्ष जयेश मोरे यांच्यासह दोन सदस्य उपस्थित होते.