• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूरात प्राचीन शिवशंकर मंदिराच्या दगडी चिरातील शिवलिंग सापडल्याने दर्शंनासाठी गर्दीं

खालापूरात प्राचीन शिवशंकर मंदिराच्या दगडी चिरातील शिवलिंग सापडल्याने दर्शंनासाठी गर्दीं, तहसिलदाराच्या हस्ते दुग्धाभिषेक

रसायनी : राकेश खराडे

खालापूर येथील सर्वे न.९२ मध्ये नविनचंद्र विश्वनाथ घाटवळ यांच्या जागेचे सपाटीकरण काम सुरू असताना मंदिराच्या दगडी चिरे आणि शिवलिंग सापडल्याने परिसरातील लोकांनी दर्शनासाठी धाव घेतली असून चर्चेला उधाण आले आहे.

खालापूर सर्वे.न.९२ ही नविनचन्द्र विश्वनाथ घाटवळ यांच्या मालकीची शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी रस्त्यासाठी काम सूरु केले असताना जेसीबीच्या साहाय्याने ते माती काढत असताना अचानक टायर रुतला यावेळी जेसीबीच्या चालकाने इंगले यांना सांगितले.यावेली पाहणी केली असता प्राचीन दगडी चिरे आणि शिवलिंग नजरेस पडले.जेसीबी चालकाने ही बाब नविनचंद्र घाटवळ यांच्या निदर्शनासही आणून दिली.यावेली नविनचंद्र यांनी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना कळविल्यानंतर तहसिलदारांनी घटनास्थळी भेट दिली.या शिवलिंगाचा प्राचीन इतिहास असावा असा अंदाज बांधला जात आहे.यावेली मातीतील शिवलिंग स्वच्छ करून त्याची पूजा व दुग्धाभिषेक करण्यात आला.ही बाब परिसरातील जनतेला कळल्यावर शिवलिंग दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली.

दरम्यान हे शिवलिंग पुरातन असावे असा अंदाज बांधला जात आहे.जेसीबीने खोदकाम करताना शिवलिंग सापडल्याने सर्वंत्र चर्चेचा उधाण आले असून नागरिक दर्शंनासाठी गर्दीं करीत असल्याचे समजते.

_________________________________________


नवीनचंद्र घाटवल यांच्या जागेत खोदकाम सुरू असताना सापडलेल्या शिवलिंगाची माहिती जिल्हा पुरातन खात्याला दिली असुन याबाबत गावात विशेष कमिटी नेमण्यात येईल

इरेश चप्पलवार-

तहसिलदार