- हक्कासाठी आंदोलन
खालापूर तहसील कार्यालतील दोन कर्मचारी सेवा निवृत्त

खालापूर : प्रसाद अटक
खालापूर तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असणारे मारुती बांगारा आणि जाबरुंग सजेचे कोतवाल दिपक गायकवाड हे वयोमानाप्रमाणे आपापल्या पदावरून सेवानिवृत्त झाले.
त्यांचा निरोप समारंभ हा अत्यंत साध्या पद्धतीने करत त्यांना खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी त्यांना पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मारुती बांगारा व दीपक गायकवाड यांनी चांगल्या प्रकारे सेवा बाजाविल्याने त्यांचे कौतुक सहकाऱ्यांनी केले.
तसेच तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी स्वतःची गाडी उपलब्ध करून देत त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या छोट्याशा निरोप समारंभास तहसीलदार इरेश चप्पलवार यांचेसह नायब तहसिलदार महसूल शाखेतील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील निरोप प्रसंगी उपस्थित होते.

54 views0 comments