• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खालापूरकरांना मोठा दिलासा...

खालापूरकरांना मोठा दिलासा, लवकरच आमदार महेंद्र थोरवेच्या माध्यमातून उभारण्यात येणार 60 बेडचे कोविड सेंटररसायनी : राकेश खराडे

सध्या सर्वत्र ठिकाणी कोरोना विषाणूने महाभयंकर रुप धारण केल्याने यावर लवकरात लवकर आळा बसावा म्हणून सर्व परिने मोठे प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अनेक कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार असल्याने दोन्ही ठिकाणी रुग्णाची वाढती संख्या पाहता रुग्णालयातील जागा फुल झाल्याने आता नव्याने कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बहुतांशी धनिक रुग्ण पैशाच्या जोरावर खाजगी रुग्णालयात उपचार घेत कोरोनावर मात करीत आहेत. मात्र याला गरीब - गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना यावर औषधे उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्याची मोठी ताराबंळ उडल्याने अनेक रुग्ण मृत्यूमुखी सुध्दा पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

तर खालापूर तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांची कोणतीही हेळसांड होऊ नये व त्यांना वेळेवर उपचारा मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आमदार महेंद्रशेठ थोरवे मोठ्या शर्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत होते. अखेर आमदार महेंद्रशेठ थोरवेच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने खालापूरात लवकर कोविड सेंटर सुरु होणार असून याठिकाणी 60 बेड चे रुग्णालयाची स्थापना होणार असल्याने 21 जुलै रोजी या कोविड सेंटरची पाहणी आमदार महेंद्रशेठ थोरवे, तहसिलदार इरेश चप्पलवार, आरोग्य अधिकारी डॉ.रोकडे, खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भंगणे, नगरसेवक संतोष जंगम, अवधूत भुर्के व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.