• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खोपोली पोलिसांची धडक कारवाई, छुप्या पद्धतीने गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक


खोपोली पोलिसांची धडक कारवाई, छुप्या पद्धतीने गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटकखोपोली : शिवाजी जाधव

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) या रोगाने अनेक कुटुंबियांनाअन्न मिळत नसल्याने भुकेचे हाल होत असून सुद्धा अश्या परिस्थीतीमध्ये आजही आमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या ही नेत्रदीपक आहे. खोपोली पोलिसांना बऱ्याच परिस्थिला सामोरे जावे लागत असून परिस्थिती ही नियंत्रणात ठेवत आहेत. परंतु व्यसन करणाऱ्या मंडळींना मात्र चाप बसत आहे. काहीच दिवसांपूर्वी अवैध मद्यपान विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडल्याने खोपोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असताना आम्ली पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेट पकडण्यात सुद्धा खोपोली पोलिसांना यश आले आहे.

आमली पदार्थांचा विक्रीचा धंदा हा सर्रास पणे खुले आम खोपोली येथील शिलफाटा येथे चालू होता. दिनांक २१एप्रिल रोजी खोपोली पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिलफाटा परिसरात एक अज्ञात महिला आढळली. पेट्रोलिंगला असणाऱ्या पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता त्या महिलेने तिचे नाव क्षमा उर्फ शम्मी शेख असे सांगितले असून पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने तिच्या जवळची पिशवी तपासली असता तिच्या जवळ १ किलो ९००ग्राम गांजा सापडला असल्याने त्या महिलेला त्वरित पोलिसांनी अटक केली असून तिची अधिक चौकशी केली असता खालापूर तालुक्यातील धामणी गावातील अशोक चव्हाण (४०) यांच्या कडून आमली पदार्थ घेतल्याचे तपासात उघड झाले असून पोलिसांनी अशोक चव्हाण यांना अटक केली आहे. सदरील दोन्ही आरोपींन विरुद्ध खोपोली पोलीस स्टेशनमध्ये ६९/२०२० अन्वये एन.डी.पी.एस १९८५ अंतर्गत ४८ व २० ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, पोलीस निरीक्षक खोपोली धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अवसर, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस शिपाई प्रवीण भालेराव, कादर तांबोळी, नुलके, प्राची शेळके यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास उपनिरीक्षक अमोल वाळसंग करीत आहेत.

लॉक डाउनच्या काळात काही दिवसांपासून मटका,जुगार,गांजा,मद्यपान यांच्या विरोधात धडक कारवाई खोपोली पोलिसांनी केल्याने खोपोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

134 views0 comments