• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खोपोली नगरपरिषद नवीन कार्यालयाच्या उद्धघटनाला इतकी घाई का..?

खोपोली नगरपरिषद नवीन कार्यालयाच्या उद्धघाटनाला इतकी घाई का..? ज्येष्ठ नगरसेवक किशोर पानसरे यांच्यासह अनेक नागरिकांचा सवाल..


खोपोली : प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असल्याने हा संसर्ग रोखण्याकरीता सरकारने अनेक उपाय योजना सुरू केल्या आहेत. काही प्रमाणात नागरिकांना सवलती दिल्या असल्या तरी नागरिकांनी स्वतः सह कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सरकार मार्फत होत आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात नसला तरी पुणे-मुंबई-पनवेल या शहराच्या मध्य ठिकाणी खालापूर तालुका असल्याने संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही हि भीती सुद्धा नागरिकांमध्ये आहे. अश्यातच तालुक्यातील शहरात नागरिकांच्या अनेक मूलभूत समस्या असतानाच खोपोली नगरपरिषद नवीन कार्यालयाच्या उद्धघाटनला इतकी घाई का..? करत आहे हा सवाल पालिकेचे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक किशोर पानसरे यांनी प्रशासनाला केला आहे..

खोपोली शहरातील नागरिकांसाठी रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्राथमिक स्थरावर तातपुरते कोव्हिड सेंटर उभारून त्यात अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करण्यास लक्ष केंद्रित करणे , वाढता संसर्ग रोखण्याकरीता WHO निर्देशित सोशल डिस्टनसिंगचा निकष पाळण्यासाठी वारंवार नियोजन करणे , आरोग्य विभागात काम करणाऱ्या घटकांना अत्याधुनिक सोयी सुविधा पुरविणे , कोरोना बाधित आणि संशयीतासाठी अधिक प्रमाणात विलगिकरन केंद्राचे निर्माण करणे , नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक सुविधा पुरविणे , शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन बाधित झाल्याने तिची दुरुस्ती करणे , मान्सूनपूर्व नाले व गटारांची झालेली दुरवस्था व्यवस्थित करून सफाई करणे , शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यावर लक्ष देणे , खोपोली नगरपालिका संचालित शाळांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्या नियमनुसार शालेय सोयी आणि सुविधाचे नियोजन करणे , महात्मा फुले भाजी मार्केट नूतनीकरणाच्या माध्यमातून भाजीपाला व्यापाऱ्याचे तात्पुरते सोय करणे , शहरातील सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरवस्था यावर उपाय योजना करणे , तसेच इतर विकास कामचे नियोजन करणे या सर्व बाबी शहरातील नागरिकांच्या अत्यावश्यक सेवा असताना यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून व नागरिकांच्या भावनेशी खेळून खोपोली नगरपरिषद नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला इतकी घाई का होत आहे हा सवाल नगरसेवक किशोर पानसरे व शहरातील अनेक नागरिकांनी शासनाला केला आहे..