• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

खानाव बौद्धवाडी ५ दिवसापासून अंधारातच, उकाड्याने नागरिक त्रस्त, विजवितरणचे मात्र दुर्लक्ष..


वावोशी : जतिन मोरे

छत्तीशी विभागातील खानाव बौद्धवाडीत गेले ५ दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला असून येथील रहिवाशांना अंधारातच रात्र व्यतित करावी लागत आहे. आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच बसून आहेत आणि त्यामध्ये ऐन उन्हाळयात खंडित झालेला वीजपुरवठा त्यामुळे येथील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

२९ एप्रिल ला झालेल्या चक्री वादळाने छत्तीशी विभागातील खानावसह खरीवली, नारंगी, गोळेवाडी, गोहे, भोकारपाडा अशा गावामध्ये धुमाकूळ घालत घरांचे, शेतीचे नुकसान केले. या वादळात विजेचे खांबही उन्मळून खाली पडले त्यामुळे या भागात ३ दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतू विजवितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा वीजपुरवठा ३ दिवसांत सुरळीत केला. परंतू खानाव बौद्धवाडीचा वीजपुरवठा मात्र सुरळीत केला नसून येथील रहिवासी ५ दिवसांपासून अंधारातच रात्र व्यतित करीत आहेत. त्यामुळे येथील लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती यांचे ऐन उन्हाळ्यातील उकाड्याने खुप हाल होत आहेत. शिवाय ही खानाव बौद्धवाडी जंगलाच्या बाजूलाच लागून असून अंधारात साप, जनावर, हिंस्र प्राणी यांची अतिशय भीती असून लवकरात लवकर येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. सदरील माहिती विजवितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून आमच्याकडे अपुरा मनुष्यबळ असल्याकारणाने ते काम करता येणार नसून तुमच्याकडून आम्हाला मनुष्यबळ पुरवा असे वरती सांगितले जाते तर कधी आणखी दोन चार दिवस थांबा तुमची विजयंत्रणा सूरळीत व्हायला आणखी वेळ लागेल असेही सांगण्यात येते. येथील ग्रामपंचायत प्रशासनाला ही समस्या सांगितली तर त्यांच्याकडूनही विजवितरणच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे असेच सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात कृती मात्र होताना दिसून येत नाही त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले असून वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करावा अशी प्रशासनाकडे कळकळीची मागणी करत आहेत अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही असेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

12 views0 comments