• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

किल्ले माणिकगडच्या जंगलात शिवकार्य ट्रेकर्स वतीने वृक्षारोपण

Updated: Jun 15, 2020


आंदोलन : राहुल जाधव

सद्याच्या घडीला जंगलात झाडे असणं ही अत्यंत काळाची गरज होऊन बसली आहे.निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाणीव ठेवून,आपण प्रत्येकाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत शिवकार्य ट्रेकर्स चे संस्थापक श्री रोहिदास ठोंबरे सरांनी वृक्षारोपण करताना व्यक्त केले.

पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी आणि किल्ले माणिकगडावर आलेल्या शिवभक्तांना सावलीसाठी किल्ले माणिकगडाच्या परिसरातील जंगलात वृक्षारोपण करण्यात आले. शिवकार्य ट्रेकर्स खालापूर वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्स ग्रुप गडकिल्यांवर जाऊन तेथील गडकिल्यांचे संवर्धन करीत असतो.याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवून इतरांच्या समोर आदर्श निर्माण करीत आला आहे.दिवसेंदिवस झाडांची होणारी हानी,जंगलात वनव्याच्या भक्ष्यस्थानी पडणारी झाडे हे सर्व लक्षात घेऊन खालापूर येथील शिवकार्य ट्रेकर्स ग्रुप वतीने किल्ले माणिकगडाच्या जंगलात रविवार दि.१४ जून रोजी वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड साहेब, वनरक्षक प्रीती पाटील मॅडम व वनपाल राजेश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

या उपक्रमात माणिकगडाच्या परिसरात जांभूळ, वड,शिसव व गुलमोहर आदी झाडे लावण्यात आली.या स्तुत्य उपक्रमात शिवकार्य ट्रेकर्स टीमने व ग्रामस्थ मंगल पारधी हातभार लावला आहे.

या वेळी वृक्षारोपण करताना रोहिदास ठोंबरे, केतन भद्रीके,प्रसाद जाधव,रोशन ठोंबरे, अंकित पारठे, सचिन कडायत, जीवन पारधी, हरिश्चंद्र निरगुडा आदिंनी वृक्षारोपण करून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.